खाजगी चेकपोस्ट नाके बंद करा ..लॉरी असोसिएशनचे कागल जकात नाका येथे आंदोलन.
कागल /गोरख कांबळे
कागल येथील जकात नाक्यावर आरटीओ चेक पोस्ट चालू होऊ न देणेबाबत तसेच महाराष्ट्रामध्ये जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड,व रावेर या ठिकाणी खाजगी पाच चेकपोस्ट नाके तयार करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. हे नाके ताबडतोब रद्द व्हावेत. या मागणीसाठी कागल येथील चेक पोस्ट जकात नाक्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
सीमा भागातील नाक्यांचे खाजगीकरण थांबवा तसेच जुने चेक पोस्ट नाके सुरू राहावेत. व होणारी लूटमार थांबवावी. तसेच “बांधा वापरा व हस्तांतरित करा” या तत्त्वानुसार बांधलेल्या नाक्यांचे खाजगीकरण तात्काळ थांबवावे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराला आळा बसावा या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन यांच्या वतीने कागल येथील चेक पोस्ट जकात नाक्यावर निदर्शने करण्यात आली. खाजगी आरटीओ चेक पोस्ट बंद करणे संदर्भात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येतील अशा प्रकारचा इशारा लोरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला आहे.
या आंदोलनामध्ये ट्रक टेम्पो डंपर या वाहनांसह ट्रक चालक मालक त्याचबरोबर जिल्ह्यातील व तालुक्यातील माल ट्रक वाहतूकदारांचे संघटनांचे पदाधिकारी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.