दहिवडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठे कारवाई
दहिवडी / एकनाथ वाघमोडे
दहिवडी पोलिसांची अवैध धंद्यांसह वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई सुरूच आहे. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात दहिवडी पोलिसांनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
वडगाव ता.माण येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकताना रोख रक्कम व वाहनांसह आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल दहिवडी पोलिसांनी या कारवाईत हस्तगत केला.
वडगाव हद्दीतील खोरीच्या पाझर तलावाजवळ काही जण पत्त्यावर पैसे पैजेवर लावून जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे दहिवडी पोलीसांनी हा छापा टाकला. या छाप्यात पंकज ओंबासे,राजेंद्र बागल,प्रकाश जाधव,हनुमंत करवले,राजेंद्र ओंबासे यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलामांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सपोनि अक्षय सोनवणे,पो.ह.खांडेकर,पो.नाईक प्रमोद कदम,प्रकाश इंदलकर व महिला पोलीस सौ.रजपूत यांनी केली.