गुन्हेगारी
कोल्हापुरात सहाय्यक अधीक्षकास पंचवीस हजाराची लाच घेताना अटक
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कसबा बावडा येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, मंगळवारी (दि. ३०) सकाळी आरोग्य उपसंचालक कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई केली.आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक अधीक्षक मारुती वरुटे याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी सकाळी आरोग्य उपसंचालक कार्यालयात सापळा रचला. २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरुटे याला रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.