Give your Advertisement
सामाजिक

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उदगावच्या नागरिकांचे उपोषण तात्पुरते स्थगित

उदगाव/ विशाल बरमे

उदगाव मधील ज्येष्ठ नागरिक व गावातील तरुण मिळून शासनाच्या उदगाव ग्रामपंचायत बाबतच्या दुटप्पी धोरणा विरोधात दिनांक 18 रोजी सामूहिक अमरण उपोषणास बसले होते सदर उपोषणाची दखल घेत शिरोळ पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी उपोषण करताना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्यात येईल यासाठी पंधरा दिवसांची मुदत घेत उपोषण सोडण्यास ची विनंती केली यावर उपोषणकर्त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कडून लेखी खुलासा घेत दिवसांसाठी उपोषण स्थगित केले असून पंधरा दिवसात जर व्यवस्थित कारभार सुरू न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषणास जाणार असल्याचे पत्र गट विकास अधिकारी यांना देण्यात आले सदर उपोषणास गावातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री महादेवी तरुण मंडळ उदगाव उदगाव अपंग संघटना बिरदेव तरुण मंडळ उदगाव मानस मित्र फाउंडेशन आधी सर्व संघटनांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यासह उपोषणात सहभागी झाले सकाळपासूनच पावसात उपोषणकर्त्यांनी गावातून प्रशासनाच्या निषेधार्थ रॅली काढत व शेवटी ग्रामपंचायत समोर उघड्यावर बसून सर्वांनी उपोषण केले या उपोषणाची तीव्रता लक्षात घेऊनच प्रशासनाने तातडीने हे उपोषण थांबवण्याचे प्रयत्न करून सदर आश्वासने देऊन उपोषण तात्पुरत्या वेळेसाठी तरी थांबवले आहे

उपोषणावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी नॅशनल डाईंग ब्लिचिंग कारखाना यांच्या थकीत असलेले 16 लाख रुपये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगणमताने माफ व्हावेत म्हणून प्रयत्न केल्या असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला तसेच लेखापरीक्षकाने मागील वर्षात चार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचे नमूद केल्याचे पत्रही उपोषणकर्त्यांना व गावकऱ्यांना दाखवण्यात आले यामुळे गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा उपोषणानंतर सर्वत्र रंगली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button