Give your Advertisement
कृषी विषयक

पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- प्रांताधिकारी सचिन ढोले

सोमंथळी/ तानाजी सोडमिसे

पीक विमा, ई पीक पाहणी, पी एम किसान, व प्रधान आवास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी तसेच लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. मौजे सोमंथळे येथे जैविक शेती मिशन व परंपरागत शेती विकास विषयी सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रांताधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना, स्वयं सहाय्यता समूहाची भूमिका निर्णय ठरणार आहे. फळ व कडधान्य पीक उत्पादनावरील खर्च कमी करून अधिक नफा मिळवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. एक रुपयात पिक विमा घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 100% सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पिक विमा अंतर्गत आपल्याला भविष्यातील होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळेल व हवामान आधारित पिक विमा योजना या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच सोमंथळी येथील शेतकऱ्यांना ई पिक पाहणी बाबत मार्गदर्शन केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून त्याची माहिती समजून घेऊन स्वतःची पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी स्वतः करावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. पिकाची नोंद असेल तर पिक विमा घेता येईल,

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुन्:रिक्षण कार्यक्रमांतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या संबंधित अधिकारी हे घरोघरी जाऊन मतदारांच्या तपशिलांची प्रत्यक्ष पडताळणी करतील, तसेच नोंदणी केलेली पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंद, मयत, स्थलांतरित नावाची वगळणी, नवीन नोंदणी व दुरुस्ती ही कामे होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना के.वाय.सी करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजे आहे. बँक खाते नंबर चुकीचा नसावा. या योजनेच्या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करावी असेही संवाद साधताना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी

सोमंथळी येथील प्राथमिक शाळेला सदिच्छ भेट दिली. त्यांच्या समवेत मंडळ अधिकारी एस वी जावीर, तलाठी डी.आर. धुमाळ, कृषी सहाय्यक एम. एम. खताळ उपस्थित होते. तसेच सोमंथळी भागातील मा.सभापती दत्तात्रय गुंजवटे, मा. उपसभापती संजय सोडमिसे, सरपंच किरण सोडमिसे, जि.प सदस्य महादेव पोकळे ,चेअरमन महादेव अलगुडे, पो.पाटील शिवाजी सोडमिसे, राम हरी भापकर, हनुमंत सोडमिसे, पोपट सोडमिसे, किसन करचे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब शिपकुले, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष शिवाजी करचे सोमंथळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

आभार प्रदर्शन महादेव पोकळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button