अपघात
मलकापूर येळाने येथे मोटरसायकलचा अपघात, एक जण जखमी

मलकापूर/रोहित पास्ते
येळाने येथे मोटर सायकल व ट्रकचा अपघात झाला. एसटी स्टँड शेजारील रस्त्यावर हा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला.
शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येळाने येथील एसटी स्टँड शेजारील कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान जयगड ला निघालेला ट्रक क्रमांक के ए २८ अ अ ३६१५ चालक मोनेश कांबर व २९ जळगाव, तालुका सिंदगी व मोटार सायकल स्वार प्रज्वल प्रकाश कांबळे वय २५ सांबू, तालुका शाहुवाडी गाडी क्रमांक एम एच ०९ एफ एक्स ६८१९ हा कोल्हापूर दिशेकडे निघाला असता हा अपघात झाला. यावेळी गंभीर जखमी मोटरसायकल स्वार प्रज्वल कांबळे यास मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता, त्यास गंभीर दुखापत झाल्याने कोल्हापूर सीपीआर रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.