नांदेड- लातूर महामार्गावर अपघात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

लोहा :- सुनील चव्हाण
नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावरील पारडी नजीक रस्ता ओलांडत असलेल्या शेतकऱ्यास भरधाव वेगातील क्रेन ने जबर धडक दिली त्यात पासश्ठ वर्षीय शेतकरी यांच्या पायावरून क्रेन चे चाक गेल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल असता उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. सदरील घटना दि. ११ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
तालुक्यातील पारडी येथील शेतकरी मारोती नारायण मोरवले (वय ६५) हे दि. ११ रोजी रात्री साडेनऊ वाजता चे दरम्यान शेतीकामे आटोपून घराकडे येत होते. दरम्यान नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील क्रेन क्र. एम एच २६ बी सी ६६२० ने मोरवले यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांच्या पायावरून क्रेन चे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटने प्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला नसला तरी खुनी क्रेन लोहा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.