फलटणमध्ये आठवडी बाजारात पारधी समाजामध्ये हाणामारी, *पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

फलटण / वैभव जगताप
फलटण मध्ये दर रविवारी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो. फलटण बाजारपेठेतील मुख्य केंद्र मानले जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचंड गर्दी असते. रविवारी पारधी समाजातील काही जणांची भांडणे मुख्य बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी बघायला मिळाली. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील शेळके यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. हातात कोयते घेऊन नंगानाच करणाऱ्यांना पोलीसांचा धाक राहिलाच नाही का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे उपस्थित होत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे.
यातच अलीकडे जबरी चोरीच्या व दरोडयाच्या घटना फलटण शहरात घडत आहेत. पोलीस डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत काय ? घटनेच्या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशन अंकित पोलीस चौकी आहे, परंतु ह्या पोलीस चौकीत एकही कर्मचारी हजर नव्हता.जर कर्मचारी क्षमता कमी असेल तशी मागणी सातारा पोलीस अधीक्षकांकडे मागणी करावी, अशी नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.